१) रवि (सुर्य)
रवि (सुर्य) मंत्र
|
ॐ घृणि आदित्याय नमः।।
|
रवि नवग्रह स्तोत्रं
|
जपाकुसुम संकांश काश्येप महाद्युतिम ।
तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम् ।।
|
रवि पीडाहर स्तोत्रं
|
ग्रहानामादिरादित्यो लोक रक्षणकारक ।
विषम स्थान संभूता पीडा हरतु मे रवि ।।
|
रवि बीज मंत्र
|
ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हौं सः सुर्याय नमः।।
|
अनिष्ट
रविसाठी उपाय
१) जर आपल्या कुंडलीत रवि अनिष्ट असेल तर
त्यामुळे वेगवेगळ्या कामात अडचणी येत असतील आणि पोट,नेत्र,हद्य,सांधेदुखी सारखे विकार होत असतील तर त्यासाठी साधा उपाय करावा,कोणत्याही रविवारी सव्वा ( १l ) किलो गुळ
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही वेळेत वाहत्या पाण्यात किंवा नदीत
सोडावे. २) पहिल्या भावात रवि असेल तर तुमच्या
पुर्वजांच्या घरी नळ बसवावा.
३) दुसऱ्या भावात रवि असेल तर वाहत्या पाण्यात
गुळ सोडावा.
४) तिसऱ्या भावात रवि असेल स्त्री किंवा
पुरुषाने आपले चारित्र्य जपावे.
५) चौथ्या भावात रवि असेल तर पुर्वजांच्या घरात
अंधांना किंवा अपंगांना जेवण घालावे. राहत्या घरी रोज हवन करावे.
६) पाचव्या भावात रवि असेल तर रोज सुर्यनमस्कार
घालावे.
७) सहाव्या भावात रवि असेल तर माकडांना गुळ वं
फुटाणे खाऊ घालावेत. मुंग्यांना साखर खाऊ घालावी. ८) सातव्या भावात रवि असेल तर स्वयंपाक
झाल्यावर अग्नि दुधाने विझवावा.
९) आठव्या भावात रवि असेल तर पांढऱ्या रंगाची
गाय सोडुन कोणत्याही गायीची पुजा करावी.
१०) नवव्या भावात रवि असेल तर स्वयंपाकासाठी
आणि जेवणासाठी मोठया आकाराच्या पितळी भांडयांचा वापर करावा.
११) दहाव्या भावात रवि असेल तर डोक्यावर टोपी
घालावी बोडके राहू नये.
१२) अकराव्या भावात रवि असेल तर मांसाहार करू
नये, दारू पियु नये.
१३) बाराव्या भावात रवि असेल तर घरात पिठाची
गिरणी असावी किंवा घरात जाते बसवुन घ्यावे.
१४) बेलाचे मूळ ताईतात घालुन ते परीधान करावे.
१५) लाजाळू किंवा मंजिष्ठ वनस्पती आंघोळीच्या
पाण्यात घालुन रविवारी त्या पाण्याने आंघोळ करावी.
२) चंद्र (सोम)
चंद्र मंत्र
|
ॐ सों सोमाय नमः
|
चंद्र नवग्रह स्तोत्रं
|
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णवसंभवम् ।।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भुषणम् ।। |
चंद्र पीडाहर स्तोत्रं
|
रोहिणीशः सुधामुर्ती सुधागात्र सुधाशन ।
विषम स्थान संभूता पीडा हरतु मे विधु |
चंद्र बीज मंत्र
|
ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्राय नमः
|
चंद्र गायत्री मंत्र – ॐ सोमराजाय विदमहे महाराजाय धीमही ।। तन्नो
चंद्र प्रचोदयात ।।
अनिष्ट चंद्रासाठी उपाय
१)अनिष्ट चंद्र हा आईला
त्रासदायक असतो त्यासाठी रविवारी रात्री पांढऱ्या भांडयात (चांदी किंवा स्टील) दुध
घालुन उशाजवळ ठेवावे व सोमवारी सकाळी जागे झाल्यावर ते दुध न बोलता पिंपळाच्या
झाडाला घालावे.
२) घरातील वयस्कर लोकांच्या पाया पडावे. लहान मुलांना नियमित दुध पाजावे.
३) चांदीची चंद्राची प्रतिमा बनवुन घ्यावी व त्याची घरात स्थापना करावी व
त्याची नियमाने पुजा करावी.
४) खिरणीचे मूळ ताईत करुन गळ्यात घालावे किंवा दंडास बांधावे.
५) सोमवारी शिवलिंगाचे दर्शन घेऊन पाण्याचा अभिषेक करावा व उपवास करावा व
त्यात मीठ खाऊ नये.
६) पौर्णिमेला चंद्राचे दर्शन घ्यावे.
७) मंत्र जप करावेत.
मंगळ
मंत्र
|
ॐ अं अंगारकाय नमः
|
मंगळ नवग्रह स्तोत्रं
|
धरणीगर्भसंभुतं विद्युत्कांती
समप्रभम् । कुमार शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ।।
|
मंगळ पीडाहर स्तोत्रं
|
भुमिपुत्रो
महातेजा जगतां भयकृत सदा ।
वृष्टीकृत वृष्टीहर्ताच पीडा हरतु मे कुज ।।
|
मंगळ बीज मंत्र
|
ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः
|
मंगळ गायत्री मंत्र
|
ॐ
अंगारकाय विदमहे शक्तिहस्ताय धीमही
|
अनिष्ट मंगळासाठी उपाय
१) शुभ ग्रहयुक्त अनिष्ट मंगळ असेल तर साखरेचे
बत्तासे वाहत्या नदीत सोडावे.
२) अनिष्ट मंगळ असेल तर तीळ व गुळाच्या रेवडया विकत घेऊन वाहत्या पाण्यात
सोडाव्यात.
३) अनिष्ट मंगळासाठी नेहमी मृगचर्माचे आसन वापरावे.
४) पुरणपोळी गरीबांना वाटाव्यात.
५) जवस कच्च्या दुधाने धुवुन वाहत्या पाण्यात सोडावेत.
६) अग्निभय असेल तर घराच्या छतावर थोडी साखर टाकावी.
७) मंगळ बाराव्या स्थानात असेल तर दुधात मध घालुन दान दयावे.
८) कुत्र्यांना पुरण पोळी खायला दयावी.
९) हनुमानाच्या मंदिरात बत्तासे अर्पण करावेत. १०) हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा, सुंदरकांड यापैकी एकाचे नित्य वाचन करावे.
४) बुध
बुध मंत्र
|
ॐ सों सोमाय नमः
|
बुध नवग्रह स्तोत्रं
|
प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम् ।
सौम्यं
सौम्यगुणोपेतं तं बुध प्रणमाम्यहम् ।।
|
बुध पीडाहर स्तोत्रं
|
उत्पातरूपो
जगतां चंद्रपुत्रो महाद्युति ।
सुर्यप्रियकरो
विद्वान पीडा हरतु मे बुध ।।
|
बुध बीज मंत्र
|
ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः।।
|
बुध गायत्री मंत्र
|
ॐ गजध्वजाय विदमहे सोमहस्ताय धीमही ।
तन्नो
बुध प्रचोदयात ।।
|
बुध अनिष्टासाठी उपाय
१) बुधाची अशुभता (अनिष्टत) कमी करण्यासाठी तांब्याच्या
नाण्याला भोक पाडुन वाहत्या पाण्यात सोडावे.
२) कवडयांची राख करुन ती समुद्रात सोडावी.
३) तृतीय स्थानी बुध असेल तर त्याची अनिष्टता कमी
करण्यासाठी मंगळवारी रात्री मुठभर मुगाची डाळ भिजत घालावी व
ही डाळ बुधवारी प्रातःकाळी
पक्षांना खायला द्यावा. हे अखंडीत ४३ दिवस करीत रहावे.
४) हिरवे मुग दान करावेत.
५) मातीच्या भांडयातून पाणी प्यावे.
६) वरधारा वनस्पती ताईतात घालुन धारण करावी.
७) गहुला वनस्पती आंघोळीच्या पाण्यात घालुन त्या पाण्याने
बुधवारी स्नान करावे.
५) गुरू (बृहस्पती)
गुरु मंत्र
|
ॐ बृं बृहस्पतये नमः।।
|
गुरु नवग्रह स्तोत्रं
|
देवानां च ॠषिणां च
गुरु कांचनसंनिभम् ।
बुद्धीभुतं त्रिलोकेशं
तं नमामि बृहस्पतिम् ।।
|
गुरु पीडाहर स्तोत्रं
|
देवमंत्री विशालाक्ष
सदा लोकहिते रतः।
अनेक शिष्यसंपूर्णं
पीडा हरतु मे गुरु ।।
|
गुरु बीज मंत्र
|
ॐ ग्रां ग्रीं ग्रौं
सः गुरवे नमः।।
|
गुरु गायत्री मंत्र
|
ॐ अंगीरसाय विदमहे
सुराचार्याय धीमही ।।
तन्नो गुरु प्रचोदयात ।।
|
अनिष्ट गुरुसाठी उपाय
१) अनिष्ट गुरु साठी जेवणामध्ये शुध्द केशर वापरावा, जीभ आणि बेंबीवर केशराचा गंध लावावा.
२) अष्टम स्थानी असलेल्या अनिष्ट गुरुसाठी पिवळ्या रंगाच्या
वस्तु मंदिरात दान कराव्यात, पिंपळ वृक्षाला
नियमित पाणी घालावे.
३) बाराव्या घरात असणाऱ्या अनिष्ट गुरुसाठी केशराचे गंध
नेहमी कपाळाला लावावे. साधू,ब्राह्मण, पिंपळाची पुजा करावी. नाक
नेहमी स्वच्छ ठेवावे.
४) दर गुरुवारी उपवास करावा. सोने,हळद,केशर,साखर,हरभऱ्याची डाळ,केळी या वस्तुंचे दान करत रहावे.
५) भारंगमूळ नावाची वनस्पती ताईतात घालून ताईत धारण करावा.
६) अनिष्ट गुरुसाठी अजुनएक उपाय म्हणजे गुरुवारी आंघोळीच्या
पाण्यात नागरमोथा घालुन आंघोळ करावी.
७) गुरुमंत्राचा नामजप सदैव करावा.
६) शुक्र (भृगु)
शुक्र मंत्र
|
ॐ
शुं शुक्राय नमः।।
|
शुक्र नवग्रह स्तोत्रं
|
हिमकुंद
मृणालाभं दैत्यांना परमं गुरुम् ।
सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ।।
|
शुक्र पीडाहर स्तोत्रं
|
दैत्यमंत्री
गुरुस्तेषां प्राणदश्च महाबल ।
प्रभुस्ताराग्रहाणां
च पीडा हरतु मे भृगुः।।
|
शुक्र बीज मंत्र
|
ॐ द्रां
द्रीं द्रौं सः शुक्राय नमः।।
|
शुक्र गायत्री मंत्र
|
ॐ भार्गवाय
विदमहे असुराचार्याय धीमही ।
तन्नो शुक्र प्रचोदयात ।।
|
अनिष्ट शुक्रासाठी उपाय
१) अनिष्ट शुक्रासाठी दुध ,ज्वारीचे दान सतत करत रहावे.
२) जेवणापुर्वी ताटातील सर्व पदार्थ
थोडे थोडे बाजुला काढुन पांढऱ्या गायीला किंवा बैलाला खावू घालावा.
३) लग्नी अनिष्ट शुक्र असेल तर
जेवणात जवसाचा उपयोग करावा,सात धान्ये एकत्र करुन ते पक्षांना खाऊ
घालावेत.
४) अनिष्ट शुक्र पंचमात असेल तर ही
अनिष्टता कमी करण्यासाठी गायीची सेवा करावी,आपले
गुप्तांग दहीदुधाने धुवावे.
५) अनिष्ट शुक्र अष्टमात असेल तर
तांब्याचे नाणे व पांढरे पुष्प घाणेरडया नाल्यात फेकावे.
६) अनिष्ट शुक्र बाराव्या स्थानी
असेल तर निळे रंगाचे फुल संध्याकाळच्या वेळेस जंगलात पुरावे.
७) अनिष्ट शुक्रासाठी चांदी,तांदुळ,हिरा,रूपे
यापैकी कोणत्याही वस्तुंचे दान करावे.
८) अनिष्ट शुक्रासाठी उपाय म्हणुन
वाघाटीचे मूळ ताईतात घालून ताईत धारण करावा.
९) अनिष्ट शुक्रासाठी अजुन एक उपाय
म्हणजे शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात पांढरे शिरस घालुन आंघोळ करावी.
१०) अनिष्ट शुक्रासाठी रुप्याच्या
भांडयातून पाणी प्यावे.
११) शुक्रासाठी उपाय म्हणुन
शुक्रमंत्र नेहमी जपत रहावे.
७) शनि
|
शनि मंत्र
|
ॐ शं शनैश्चराय नमः।।
|
|
शनि नवग्रह स्तोत्रं
|
नीलांजन
समाभासं रविपुत्रं यमाग्रजम ।
छायामार्तंडसंभुतं
तं नमामि शनैश्चरम् ।।
|
|
शनि पीडाहर स्तोत्रं
|
सुर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय
।
मंदचार प्रसन्नात्मा पीडा हरतु मे शनि ।।
|
|
शनि बीज मंत्र
|
ॐ प्रां प्रीं प्रौं
सः शनैश्चराय नमः।।
|
|
शनि गायत्री मंत्र
|
ॐ शनैश्चराय
विदमहे छायापुत्राय धीमही ।
तन्नो मंदः प्रचोदयात ।।
|
अनिष्ट शनिसाठी उपाय
१)
अनिष्ट शनीचा त्रास कमी होण्यासाठी जेवणापुर्वी ताटातील सर्व पदार्थ थोडे
थोडे बाजुला काढुन ते कावळ्याला किंवा काळ्या कुत्र्याला खाऊ घालावा.
२) शनि पीडा कमी करण्यासाठी शनिवारी
शनीच्या डोक्यावर मोहरीचे किंवा तिळाचे तेल वहावे आणि नंतर उडीद व काळे मोठे मीठ
वहावे.
३) अजुन एक उपाय म्हणजे ( कोणत्याही
शनिवार पासून सुरु करावा ) पहिल्या शनिवारी एक मोहरीच्या तेलाचा दिवा
सूर्यास्तानंतर लावावा दुसऱ्या शनिवारी दोन दिवे असे अकरा शनिवार करावे व बाराव्या
शनिवारी परत अकरा दिवे लावावेत व नंतर १०,९,८ याप्रमाणे १ पर्यंत करावे.
४) प्रत्येक शनिवारी सूर्यास्तानंतर
पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीचा दिवा लावावा व पिंपळाच्या झाडाला गुळाचे पाणी अर्पण
करत आठ प्रदीक्षणा माराव्यात.
५) कोणत्याही शनिवारी सूर्यास्तानंतर
पश्चिमेकडे तोंड करुन बसावे, चौरंगावर काळया
कापडावर ताम्हनात शनि यंत्र ठेवावे व त्यावर मोहरीच्या तेलाने २१ वेळा “ नीलांजन समाभासं रविपुत्रम यमाग्रजम l छायामार्तंड
संभूतं तं नमामि शनैश्चरम् ll “ हा मंत्र म्हणत अभिषेक करावा
व त्यानंतर त्या तेलामध्ये आपला चेहरा बघावा व आपली पीडा किंवा त्रास शनिदेवास
सांगावे नंतर त्याच्यात एक खिळा टाकावा व ते तेल पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे व
माघे न बघता घरी निघून यावे.
६) शनिवारी मारुतीस रुईच्या पानाचा
हार घालावा वं शेंदूर मिक्स मोहरीचे तेल डोक्यावर अर्पण करावे नंतर श्री रामरक्षा, हनुमान चाळीसा वाचावी.
८) राहु
राहु मंत्र
|
ॐ रां राहवे नमः।।
|
राहु नवग्रह स्तोत्रं
|
अर्धकाय महावीर्य
चंद्रादित्यविमर्दनम् ।
सिहिंकागर्भसंभुतं तं राहु प्रणमाम्यहम् ।।
|
राहु पीडाहर स्तोत्रं
|
महाशिरा महावक्त्रो
दीर्घदंष्ट्रो महाबलः।
अतनुश्चोर्ध्वकेशश्च
पीडा हरतु मे शिखी ।।
|
राहु बीज मंत्र
|
ॐ भ्रां भ्रीं भ्रौं
सः राहवे नमः।।
|
राहु गायत्री मंत्र
|
ॐ नगध्वजाय
विदमहे पद्महस्ताय धीमही ।
तन्नो
राहु प्रचोदयात ।।
|
अनिष्ट राहुसाठी उपाय
१) अनिष्ट राहुची पीडा कमी
होण्यासाठी (शक्य झाल्यास आपल्या वजनाएवढे कोळसे) नाहीतर थोडेसे कोळसे वाहत्या
नदीत सोडावेत.
२) भाजीसाठी वापरला जाणारा मुळा दान
करावेत.
३) अनिष्ट राहुसाठी सकाळी लवकर उठून
मसुरडाळ व काही नाणी भंग्याला द्यावीत.
४) जवसाचे काही दाणे उशाला ठेऊन
झोपावे व सकाळी लवकर उठून पक्षाला खायला घालावेत.
५) जवसाचे काही दाणे दुधाने धुवुन
वाहत्या पाण्यात सोडावेत.
६) सरकारी दंड होण्याची शक्यता
असल्यास व कोर्टकचेरीचा तगादा चालु असेल तर आपल्या वजनाएवढे कोळसे वाहत्या नदीत
सोडावेत.
७) बाराव्या भावात राहु असेल तर
स्वयंपाक घरात बसुनच जेवण करावे.
८) अनिष्ट राहु असेल तर एक नारळ
समुद्रात अर्पण करावा.
९) राहुची पीडा कमी होण्यासाठी
ब्राम्हणाला नमस्कार करावा
१०) अनिष्ट राहुसाठी शरपुंखा
वनस्पतीची मुळे आंघोळीच्या पाण्यात घालुन आंघोळ करावी.
९) केतु
केतु मंत्र
|
ॐ कें केतवे नमः।।
|
केतु नवग्रह स्तोत्रं
|
पलाशपुष्पसंकाशं
तारकाग्रहमस्तकम् ।
रौद्रं
रौद्रात्मंक घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ।।
|
केतु पीडाहर स्तोत्रं
|
अनेकरूपवर्नैश्च
शतशोथ सहस्त्रश ।
उत्पात रूपो जगतां पीडा हरतु मे तम ।।
|
केतु बीज मंत्र
|
ॐ स्त्रां स्त्रीं
स्त्रौं सः केतवे नमः।।
|
केतु गायत्री मंत्र
|
ॐ जैमिनी गोत्राय
विदमहे धुम्रवर्णाय धीमही ।
तन्नो केतु प्रचोदयात ।।
|
अनिष्ट केतु साठी उपाय
१) अनिष्ट केतु साठी सर्वोत्तम उपाय
म्हणजे गणेश पुजन करावे.
२) चपाती किंवा भाकरी कुत्र्याला खाऊ
घालावी.
३) अनिष्ट राहु साठी कोणत्याही
मंदिरात काळी कांबळ दान करावी.
४) आंघोळीच्या पाण्यात लोध्र वनस्पती
घालुन त्या पाण्याने आंघोळ करावी.
५) केतु मंत्राचा नामजप करत रहावे.
सुचना = वरील लेखाची प्रस्तुत लेखक कोणतीही जबाबदारी घेत नाहीत,प्रत्यक्षात उपाय
तज्ञ ज्योतिषाकडुन घेऊन करावेत.